सांग जरा .....
सांग शब्द कोणते पोखरतात तुला?
सांग धून कोणती पांघरवते तुला ?
गुंफूनि दोन्ही आता गीत हे बनवेल मी.
तार छेडीत साथ तू आज मला देशील का?
सांग काहूर कोणते हे पेटते श्वासांतूनी ?
सांग कहर कोणता माजतो अक्षांतूनी ?
ऐकवटवून दोन्ही आता ज्योत हि तेजवेल मी .
तूप घालून लक्ष्याचे ज्वलंत तिला ठेवशील का?
सांग स्वप्न कोणते जागे ठेवते तुला ?
सांग झोप कोणती स्वप्नात नेते तुला?
साखरझोपेच्या स्वप्नांतूनी घेऊन तुला उडेल मी.
अंतर नापित सफर तू स्वर्गात त्या नेशील का?
सांग जरा ....
सांग जरा ....
उघडुनि तुझा अंतरात्मा,
प्रवेश मला तू देशील का ?
No comments:
Post a Comment