सांत्वन केलेस तू माझे सखी
योजुनी प्रित्यस्तुती मुखी
भास होता मुकूर
काळजीचा तो स्वर
मृगजळच ते.
तलम रेशमात गुंफल्यास ओळी
साजूक तुपातली जशी पोळी
खंत न होती नयनी
असत्य ते वचनी
मृगजळच ते.
बाहुपाशात ओढती तुझे हस्त
देह सुखावतो होऊन मदमस्त
पर वाघनखे ती तयार
मजवर करण्यास वार
मृगजळच ते.
कस्तुरीस तुझ्या भुललो, वेडापिसा भटकलो एक मृग मी
आहे कस्तुरी माझ्यात ही, विसरलो कसा कस्तुरीमृग मी?
सखे आपुली ही यारी
माझ्यावरच ग पडेल भारी
मृगजळच ते.
भटका मी, तृष्णेत मी
पण दिशा तुझी सोडेल मी
नाही येणार तुझ्या व्यूहात,
मोहिनीत या, ना तुझ्या प्रेमात
मृगजळच ते.