ताठरलेल्या कण्याची ताठरली ती मान,
तुझा रंक कसा झाला...
वाकला तो की संपले हे प्राण?
परखड वाणीची प्रांजळ जुबान,
शब्द झाले रुसवे की बहिरे झाले कान?
का असा निर्लज्ज तू, उभा शत्रूच्या उंबरठी
मिटला तो पुरुषार्थ सारा की उरली नाही मती?
नजर झुकवणे शिकलास कुठे?
गिळलास ती प्रतिष्ठा कुठे?
विचार तरी हा आलाच कसा माथी?
वाटलीस अब्रू सारी की नव्हतीच ती कधी?
मोह हा जडला तुला की उन्माद हा चढला?
अरे प्राण त्यागतो कशासाठी हेच तू भुलला?
बघ जरा त्या झापड्या उघडून,
कोणादारी भिक्षुक तू?
ऐक जरा पडदे खोलून,
स्तुतीतली निंदा
हार गळ्यात घालून की फाशीचा फंदा?
बघ राजा...अरे बघ जरा,तुझा रंक कसा झाला...
No comments:
Post a Comment