Friday, January 11, 2019

धडधड

धडधड

यातनांचा भार हा घेऊन उरी,
स्पंदनांना आक्रोश स्फुरी,
क्षणिक रांधते परोपरी,
श्रमिक हृदय हे माझे... ।।

कैद ते फासळ्यांत ह्या,
पाईक ते काळाचे ह्या,
चक्र ते गतीचे ह्या,
तडफडीक काळीज हे माझे...।।

विश्राम तुला देऊ कसे?
थांब जरा तरी, म्हणू कसे?
अन् मुक्त तुला करू कसे?
नशिबी तुझ्या जगणेच हे माझे...।।


No comments:

Post a Comment